प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – महाराष्ट्र शासन महसूल विभागा तर्फे देण्यात येणारा महत्वाचा असा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून यंदा जळगाव तालुक्यातील सजा तरसोद व नशिराबाद येथे कार्यरत असणारे श्री रुपेश अनिल ठाकूर यांना जळगाव जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जि प मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणंवाल उपस्थित होत्या. सत्कारमूर्ती रुपेश ठाकूर हे काशिबाई ऊखाजी कोल्हे विद्यालय जळगाव येथील उपशिक्षक अनिल ठाकूर यांचे चिरंजीव असून त्यांचे मुळ गाव भुसावळ तालुक्यातील सुनसगाव आहे.त्यामुळे या पुरस्काराने सुनसगाव येथे जल्लोष करण्यात आला.