अडावद ता.चोपडा :(प्रतिनिधी महेश गायकवाड)
चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर तथा गट विकास अधिकारी कोसोदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑनलाइन अँपद्वारा पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.
चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दुषीत पिण्याच्या पाण्याने साथीचे आजार उदभवणार नाहीत, या मुख्य उद्देशानेच… संपुर्ण जिल्ह्याभरात दर सहा महिन्यांनी स्त्रोतांचे ‘जिओ फेनसिंग’ या खाजगी मोबाईल अँप वरून आरोग्य कर्मचारी हा प्रत्यक्ष त्या स्रोतांच्या ठिकाणी जाऊन आणि त्यांच्या मदतीला संबंधित ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे सर्वेक्षणात.. प्लास्टिकच्या एक लिटर आकाराचे कॅनमध्ये योग्य स्रोताचा पाणी नमुना जागेवरच घेण्यात येऊन, त्यांची रासायनिक आणि जैविक तपासणी करण्याकरिता, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ते संपुर्ण पाणी नमुने तालुक्यातील प्रयोगशाळेत पाठविले जातात.
अशाच प्रकारे अडावद उनपदेव रस्त्यालगत,वाड्या वस्ती,उनपदेव येथील क्षरभंगनगर मधील आदिवासी भागात उन्हातान्हात जाऊन आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक-विजय देशमुख, यांच्या समवेत अडावद ग्रामपंचायत चे कर्मचारी-प्रेमराज पवार, पुरुषोत्तम महाजन,संजय महाजन,तसेच सर्व आरोग्य कर्मचारी-प्रकाश पारधी, महेंद्र पाटील,अविनाश चव्हाण, संतोष भांडवलकर, प्रत्येक ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व त्यांचे कर्मचारी आदी सर्व ही मोहिम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.तसेच फोटो मध्ये स्रोताचा पाणी नमुना घेतांना आरोग्य सेवक-विजय देशमुख,व
ग्रामपंचायत कर्मचारी-पुरुषोत्तम महाजन दिसत आहेत.