“आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन मांत्रिक, मातोश्रीवर मुक्काम अन्…” खळबळजनक दावा

0
13

राज्याच्या राजकारणात सध्या काळी विद्या आणि काळी जादू यावरून आरोप प्रत्यारोपांच राजकारण रंगल आहे. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपाला रामदासभाई कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या ठाकरे सेनेकडून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री भरत गोगावले यांच्यावरही अशा स्वरूपाचे आरोप झाले आहेत. आता या सगळ्याला रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर देत थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केलं आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक होऊ नये म्हणून हैद्राबादवरून एक मांत्रिक आणला गेला असा खळबळजळक आरोप रामदासभाई कदम यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केल्याने खळबळ उडाली आहे.

या मांत्रिकाला दोन दिवस मातोश्रीवर ठेवला, त्यानंतर पाच दिवस खोपोलीत त्यांचं जे राहण्याचे ठिकाण आहे तिथं पाच दिवस ठेवला आणि तिथे बसून आदित्य यांना अटक होऊ नये म्हणून तांत्रिक विद्या केली हे खरं आहे की खोटं आहे असा सवाल करत या तांत्रिकाला शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा मुंबईतील एक खासदार घेऊन आला असा दावा करत ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे एकदा उद्धव ठाकरे यांना विचारून घ्या अशा शब्दात ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आणि मी त्याचे फोटो देईन मी त्याचं नाव देईन मी पुराव्यासकट बोलतो असाही मोठा दावा रामदासभाई कदम यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलंय. मी पुराव्यासकट बोलतो बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हे आम्हाला माहिती आहे आम्ही भास्कर जाधव यांच्यासारखी हवेत तलवार कधीही चालवत नाही. ज्याला कावीळ झालेली असते त्याला सारे जग पिवळे दिसतं, असंही रामदास कदम म्हणाले.

भास्कर जाधव सुरज च्या बॉर्डर पर्यंत आले होते

भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघातून केवळ 2200 मतांनीच निवडून आले आहेत. नवीन उमेदवार याच्या तोंडाला फेस आणतो याचं मतदारसंघात काम काय आणि आता म्हणून राजकीय संन्यास घेणार असं म्हणत आहे पण तू संन्यास घेणार नाहीस तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनताच तुला राजकीय संन्यास घ्यायला लावत आहेत हे वास्तव आहे, असाही आरोप रामदास भाई कदम यांनी केला आहे. भास्कर जाधव यांचे राजकीय बाप किती आहेत माहिती नाही एकनाथ शिंदे जेव्हा गेले तेव्हा भास्कर जाधव सुरतच्या बॉर्डर पर्यंत पोहोचला होता असा एकेरी उल्लेख करत रामदास कदम यांनी दावा केला आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि त्याला सांगितलं की तुम्हाला भाजपकडून प्रखरविरोध आहे तुम्ही पंतप्रधानांची नक्कल केली होती सध्या तुम्हाला आम्ही घेणार नाही नंतर तुमचा विचार करून बघू असं एकनाथ शिंदेंनी भास्कर जाधव यांना सांगितलं होतं असाही दावा या खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम व नारायण राणे यांच्या वरती बोललो की मी मोठा होतो आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी भास्कर जाधव बोलत आहेत ठाकरेंना खुश करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करण्याचे काम भास्कर जाधव करत आहेत असाही टोला रामदासभाई कदम यांनी लगावला आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या बोलण्याला आपण फार किंमत देत नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशा शब्दात उत्तर देत रामदास कदम यांनी केलेली दावे फेटाळले आहेत.

Spread the love