आदीवासी नागरीकांच्या आरोग्यासाठी व अमृत पोषण आहार योजनेसाठी वर्षाला कोटयावधीचा खर्च तरीही कुपोषणग्रस्त

0
47

यावल ( प्रविण मेघे) शासनाकडुन आदीवासी वस्ती व पाड्यांसाठी विविध योजना अंतर्गत जवळपास आठ कोटी रुपयांचा निधी मिळत असतो असे असतांना तालुक्यात आठ महिन्यांचा बालक कुपोषणाचा बळी पडतो ही शोकांतिकाच म्हणावी लागेल या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास अधिकारी विनिता सोनवणे यांच्याकडुन जाणुन घेतला आदीवासींच्या योजना संदर्भातील माहीतीचा विशेष वृत्तांत . यावल तालुक्यातीत वड्री आसराबारी येथील आदीवासी वस्तीवर मागील महीन्यात कुपोषणामुळे आट महीन्याच्या आकाश बारेला या नांवाच्या बालकाचा जळगाव येथे दुदैवी मृत्यु झाला आणी या निमित्ताने तालुक्यात महीला व बालविकास विभाग व आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ आणी भ्रष्ठ कारभाराचे पितळ उघडे पडुन सत्य समोर आलेत, दरम्यान त्या आदीच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत तालुक्यातील कुपोषणग्रस्तांची धक्कादायक आकडेवारी समोर याच वेळीस डॉ .आशिया यांनी महीला व बालविकास तथा आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षीत कारभारावर नाराजी व्यक्त केली होती . याबाबत प्रस्तुत प्रतिनिधी यांनी एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या आदीवासी वस्तीवर वास्तव्यास राहणाऱ्या आदीवासी बांधवांच्या चिमकुल्या मुलांसाठी ए पी जे अब्दुल कलाम अमृत पोषणहार या योजनेच्या माध्यमातुन आदीवासीच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येवु नये यासाठी शासनाच्या वतीने वर्षाला सुमारे तिन कोटी रुपयांचे खर्च केले जातात तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातुन आदीवासी बांधवांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबवुन त्यांच्या कुटुंबाची युद्ध पातळीवर काळजी घेण्या संदर्भात विविध आरोग्य योजने अंतर्गत वर्षाला पाच कोटी रूपयांचा निधी खर्च केला जात असतात अशी माहीती प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिली असुन आमच्या विभागाअंतर्गत केलेल्या शोध कार्यात देखील आदीवासी योजनेच्या अमलबजावणी संदर्भात अनेक गंभीर प्रकार समोर आले असुन , आमच्या ही स्वतंत्र चौकशीचा अहवाल हा वरिष्ठा पर्यंत पाठविण्यात आले आहे .असे असतांना ही जळगाव जिल्ह्यात व यावल तालुक्यात कुपोषणग्रस्तांची वाढलेली संख्या ही धक्कादायक व शासकीय योजना या खऱ्या अर्थाने आदीवासी वस्ती व पाडया वाडयांवर फक्त कागदावरच पहोचलेली दिसुन येत असुन, प्रत्यक्षात या योजनांची अमलबजावणी झालेली नसल्यानेच कुपोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आलेत. या सर्व कुपोषणग्रस्तांच्या विषयाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांनी गांर्भीयाने घेतले असुन , कुपोषण संदर्भातील निष्पक्ष चौकशी व्हावी या दृष्टीकोणातुन त्रियसदस्यांची नेमकुण केली व समितीच्या अहवालावरून कुपोषणग्रस्त आट महीन्याच्या बालकाच्या मृत्यु प्रकरणी ७ जणांना शॉकॉज नोटीसा पाठविल्या असुन , पुढील होणाऱ्या कार्यवाहीकडे विविध राजकीय पक्ष समाजसेवी संघटना व आदीवासी बांधवांसह सर्वांचे लक्ष लागुन आहे .

Spread the love