गतवर्षी राज्यभरात झालेल्या तलाठी भरतीतील लेखी परीक्षेत अवघ्या ४० मिनिटांत पेपर सोडवून बाहेर पडणाऱ्या ६२ जणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या सर्वच उमेदवारांची पुराव्यानिशी पडताळणी करून निकाल लावण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. .
त्यानुसार जळगावच्या तिघा उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांनी ‘शाळा’ भरवली आणि उत्तरे देण्यात गडबडल्याने तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश रामभाऊ गेठे (अमरावती), भूषण रघुनाथ पाटील (गोताणे, ता. जि. धुळे) व भागवत जनार्दन परिहार (अंजरवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा) अशी या तीनही आरोपींची नावे आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी या तिघांच्या भूमिकेविषयी पडताळणी केली. संगणकीय गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उघड झाल्याने महसूल विभागाच्या तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली












