ममुराबाद : कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह शासनाच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधून कृषी सहाय्यक बालाजी कोळी यांनी केलेल्या कामांमुळे परीसरातील शेतकऱ्यांच्या मनात आपुलकी निर्माण झाली आहे. कृषी सहाय्यक हा जनतेचा सेवक असतो याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे बालाजी कोळी आहेत, असे गौरवोद्गार येथील शेतकर्यांनी काढले. प्रमुख उपस्थितीत सर्व वि का सोसायटी व पिक संरक्षण सोसायटी चे पदाधिकारी होते.
यावेळी बालाजी कोळी, म्हणाले हा परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. येथे शेतकरी व जनता नेहमी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यामुळेच काम करताना कोणतीही अडचण भासली नाही. या जनतेच्या पाठबळावर आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे नावलौकिक झाला व आनंदमय वातावरणामध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी गावाला लाभलेले नवीन कृषी सहाय्यक श्री प्रवीण सोनवणे कानळदा येथील कृषी सहाय्यक श्री दशरथ सोनवणे.वि.का. सोसायटीचे चेअरमन श्री परिक्षित ढाके. व्हॉ चेअरमन उषाबाई पाटील.पीक संरक्षण सोसायटीचे अध्यक्ष श्री बन्सी पाटील. व उपाध्यक्ष श्री राजेंद्र पाटील. सेक्रेटरी किशोर चौधरी . श्री अशोक गावंडे. डॉक्टर उल्हास पाटील .रावजी शिंदे. मधुकर चौधरी. श्री आत्माराम कोळी. आबा देवरे. राहुल ढाके. सुखदेव सावकारे. भानुदास सोनवणे. छोटू ढाके. किरण पाटील. डॉक्टर रावसाहेब पाटील. पिंटू पाटील. चंद्रकांत पाटील. शैलेश पाटील. अनिल पाटील. अमर पाटील. गोपाल मोरे. महेंद्र सोनवणे. व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.












