कृषि विभाग भुसावळ तर्फे आत्मा योजनेंतर्गत मोढाळे येथे शेतीशाळा शेतदिन कार्यक्रम संपन्न

0
22

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ -: दि. 03 डिसेंबर २०२४ रोजी मौजे मोंढाळे ता. भुसावळ येथे श्रीमती कमलाबाई भिकारी कोळी यांचे शेतात आत्मा योजनेतंर्गत कापूस शेतीशाळेच्या ६ व्या क्लास निमित्ताने शेतदिन कार्यक्रमाचे आयोजन मा. तालुका कृषी अधिकारी कार्यालय भुसावळ यांचे तर्फे करण्यात आले होते.

शेतीशाळेत कृषि विज्ञान केंद्र पाल चे प्रमुख शास्त्रज्ञ श्री महेश महाजन सर यांनी स्वच्छ कापूस वेचणी व वेचणीनंतर घरात साठवण करतांना कापसात किडी, धुळ यामुळे प्रत खराब होऊ नये म्हणून करावयाची उपाययोजना याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना विस्तृत माहिती दिली. तसेच श्री अतुल पाटील सर यांनी कापूस पराटयाचे कुट्टटी करून त्यात शेणखत, शेतातील इतर टाकाऊ पदार्थ, जनावरांचा उष्टावलेला चारा यापासून घरच्या घरी कंपोस्ट खत कसे करता येईल व त्यामुळे खताच्या खर्चात बचत होऊन जमिनीची आरोग्य टिकून राहून सुपिकता कशी वाढविता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मंकृअ भुसावळ श्री शुभम मैड यांनी शासनाच्या विविध कृषि योजना याबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी हरभरा पिकांसाठी फेरोमन ट्रॅप व लुर्स चे वाटप श्री महेश महाजन यांचे शुभहस्ते करण्यात आले.

श्री सोपान कोळी यांनी शेतीशाळेत अवलंब केलेल्या तंत्रज्ञानामुळे त्यांची उत्पादन खर्चात बचत होऊन एकरी 2 क्विंटलने वाढ झाली याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांकडून शेतीशाळेचा मागोवा प्रमोद जाधव (तंत्र व्यवथापक आत्मा) यांनी घेतला तर श्री मानसिंग भोळे (कृ.सहा. मोंढाळा) यांनी सर्व शेतकरी नेहमीप्रमाणे क्लासला वेळेवर उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच शेतीशाळा घेण्यासाठी नेहमी श्री सुनिल पाटील व श्री संतोष डोलसे यांचे योगदान लाभले याबद्दल आभार व्यक्त केले.

Spread the love