रावेर प्रतिनिधी – राजेंद्र महाले
ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडल संचलित, सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महविद्यालयात नुकतेच बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडलाचे अध्यक्ष भागवत पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देवून गौरवण्यात आले. भास्करराव आनंदराव पाटील बक्षीस व पारितोषिक, भारतीय जीवन विमाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमांत प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने व कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारितोषिक वितरण समितीचे चेअरमन प्रा.एस.आर.इंगळे व प्रा.व्ही.एच.पाटील यांनी केले. तर आभार प्रा. एम. के. सोनावणे यांनी मानले.
कार्यक्रमास ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत पाटील, चेअरमन श्रीराम पाटील, उपाध्यक्ष आर.एन. महाजन संस्थेचे संचालक डॉ. सतीश पाटील, एन.व्ही.पाटील, कैलास पाटील महाविद्यालय विकास समिती सदस्य पांडुरंग पाटील, दिलिप पाटील, प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, उपप्राचार्य डॉ. एस बी. पाटील, डॉ. के. जी. कोल्हे, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारितोषिक वितरण समितीचे चेअरमन प्रा.एस.आर.इंगळे व सदस्य प्रा.एस.बी.महाजन, प्रा. एम. के. सोनावणे व प्रा.व्ही.एच.पाटील यांनी परीश्रम घेतले.












