अजिंठा हाउसिंग सोसायटीत सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी 

0
22

जळगाव :- महान सम्राट अशोक यांची २५३९ वी जयंती अजिंठा हाउसिंग सोसायटीतील जेतवन बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ होते, प्रा. किसन हिरोळे , इंजी. ममता सपकाळे यांची मुख्य भाषणे झाली. त्यांनी सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भालेराव, प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन दिलीप सपकाळे ,आभार प्रदर्शन ॲड. आनंद कोचुरे, स्वागत पी. डी. सोनवणे, परिचय नथु अहिरे यांनी तर बाबुराव वाघ यांनी बुद्ध वंदना घेवून प्रतिमेचे पूजन केले. सम्राट अशोक यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

या प्रसंगी विजया शेजवळे, हर्षल सुरळके, संजय सपकाळे, विमल भालेराव, सुमन बैसाने, अंजना भालेराव, मनकर्णा सुरवाडे, कविता सपकाळे, गीता सोनवणे, आशा सपकाळे, कल्याणी सुरळके, लता बिऱ्हाडे, कुसुम सोनवणे, राधिका जोहरे, अशोक सैंदाणे, आदींसह बहुसंख्य स्त्री पुरुष कार्यक्रमास हजर होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुध्द, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

Spread the love