अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का

0
37

मुंबई – राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचा याचा फैसला अखेर निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येतोय.

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचं? हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला होता. अखेर याचा फैसला निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येतोय. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे.

Spread the love