खातेवाटपासंदर्भातील मोठी बातमी; अजित पवार गटाला ‘ही’ दोन खाती मिळणार

0
40

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात घडामोडी घडत आहेत. अशातच आता खातेवाटपासंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाला दोन मोठी खाती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अर्थखातं अजित पवार गटाकडे राहील, अशी माहिती आहे. तसंच राज्याचं महसूल खातंही अजित पवार यांच्याच कडे जाणार असल्याची माहिती आहे.

अर्थखातं आपल्याकडे राहावं अशी आग्रही भूमिका अजित पवार यांची आहे. तसा प्रस्ताव त्यांनी भाजपसमोरही मांडला. भाजपला तो मान्य असल्याची माहिती आहे. पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा अर्थ खातं अजित पवार यांना देण्यास कडाडून विरोध आहे.

Spread the love