अजित पवार भाजपसोबत जाणार? अंजली दमानियांच्या ट्विटमुळे खळबळ

0
32

राज्यातील सत्तासंघर्षावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरही निकाल दिला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणात काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 15 आमदार बाद होणार आणि अजित पवार भाजपसोबत जाणार असं ट्विट केलं आहे. दमानिया यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची… ”

Spread the love