अखेर चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव या रस्त्याला दुरूस्तीसाठी निधी मंजुर झाला भिमआर्मीच्या रास्ता रोको आंदोलनास यश

0
37

दिपक नेवे

यावल -तालुक्यातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्य मार्गावर चुंचाळे फाट्यावर आज सकाळी ११ वाजता भिमआर्मीचे राज्य सचिव सुपडु संदाशिव यांच्या नेतृत्वाखाली चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या दुर्लक्षित रस्त्याची तात्काळ दुरुस्त व्हावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले , या आंदोलनाच्या माध्यमातुन जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ या रस्त्यासाठी १७ लाखाचा निधी मंजुर केला असुन, येत्पा काही दिवसात या रस्त्याच्या कामासा सुरूवात होईल असे आश्वासन जिल्हा परिषदचे आरोग्य आणी शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील ( छोटु भाऊ ) पाटील यांनी दिल्याने आंदोलनाची सांगता झाली . दरम्यान यावल तालुक्यातीत बुऱ्हाणपुर ते अंकलेश्वर राज्य मार्गाला जोडुन असलेल्या चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या तिन किलोमिटर रस्त्याची मागील काही वर्षापासून ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असुन या मार्गावरून पादचारी असो की वाहनधारक असो या सर्वाना वावरता तारेवरची कसरत करावी लागत असुन , वाहनधारकांना अनेक अडचणी प्रसंगी अपघात व वेदनांना सामोरे जावे लागत असल्याने गावातील ग्रामस्थ मंडळीने लोकप्रतिनिधींना या रस्त्या संदर्भातील जाणीव देखील करून दिली होती मात्र हो च्या आश्वासना शिवाय काहीच चुंचाळे वासीयांच्या पदरात पडत होते , अखेर चुंचाळे गावातील राहणारे भिमआर्मी या संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडु संदाशिव यांनी या मार्गा बद्दल पाठपुरावा केला व आज दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे फाटयावरच्या राज्य मार्गावर सुमारे ५oमिनिटांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेत या आंदोलनात भिमआर्मीचे राज्य प्रवक्ता रमांकांत तायडे ,तालुका अध्यक्ष हेमराज तायडे , तालुका उपप्रमुख आकाश बिऱ्हाडे , सत्यवान तायडे , सचिन वानखेडे , भैय्या तडवी , सचिन पारधे ,पंकड डांबरे, चंदु पारधे यांच्या शिवाय गावातील काही सुज्ञ ग्रामस्थांने देखील यात आपला सहभाग नोंदवला , यावेळी ५० मिनिटांपर्यंत झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाल्याने शेकडो वाहने ही राज्य मार्गावरील रस्त्याच्या दोघ बाजुला थांबली होती , या आंदोलना प्रसंगी पोलीसांनी आपला बंदोबस्त चोख बजावला .

Spread the love