अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम..

0
27

India Pakistan 

आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील असे मिस्त्री यांनी सांगितले.

मिस्त्री यांच्या घोषणेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती केला आहे. याबाबत ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हे जाहीर करताना त्यांना आनंद होत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, अद्याप याबाबत भारताकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसून, संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे. यात याबाबत काय घोषणा केली जाते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान तात्काळ शस्त्रसंधीची सहमती दर्शवल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ वाटाघाटींनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ट्विट केले की, ‘गेल्या ४८ तासांत, उपराष्ट्रपती व्हान्स आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री @SubramanyamJaishankar, लष्करप्रमुख @AsimMunir आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार @AjitDoval आणि @AsimMalik यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी बोललो आहोत. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी तात्काळ युद्धबंदीवर आणि तटस्थ ठिकाणी व्यापक वाटाघाटी सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. शांतीचा मार्ग निवडण्यात पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांच्या शहाणपणा, विवेक आणि राजकारणाबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.’

Spread the love