दिपक नेवे
यावल तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत येथील वादग्रस्त ग्रामसेवकाची अखेर बदली करण्यात आल्याची माहीती पंचायत समितीच्या सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे दरम्यान ही बदली त्या ग्रामसेवकाचे नायगाव येथील कार्यकाळ संपल्याने त्यांची तालुकाअंतर्गत साकळी ग्रामपंचायती प्रशासकीय पातळीवर बदली झाल्याचे कळते , या संदर्भातील वृत्त असे की नायगाव येथे १६ फ्रेब्रुवारी २०१६ ला ग्रामसेवक म्हणुन पी पी सेंदाणे हे नायगाव ग्रामपंचायतीला हजर झाले होते. हजर होताच त्यांनी काही मंडळी स हाताशी धरून मनमानी कारभार सुरु केला. आजपर्यंत त्यांनी नायगाव ग्रामपंचायतीला सर्व बाजुने धुवून खाल्ले नायगाव च्या विकासात खिळ घातली. या सर्वात गंभीर विषय म्हणजे आर्थिक स्वार्थापोटी गावातील मतदारांना सोडून बाहेरगावाहून आलेल्याना परप्रांतांच्या नांवावर घरकुल मंजुर करून दिले गेले या संदर्भात तक्रारी झाल्यावर देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही यावल पंचायत समितीच्या दिसुन आती नाही . दरम्यान हा सर्व प्रकार पाहुन ही मंडळी गप्प का होती. याचा अर्थ काय समजावा.आताच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही पारदर्शकता व स्वाभीमान जपणारे सदस्य निवडून आले आणि त्यांनी या सर्व आर्थीक गोंधळाचा आवाज उठवून गैरकारभारा विरुद्ध गटविकास अधिकारी , सिईओ. ग्रामविकास मंत्रालय पर्यंत तक्रारी केल्या. आवाज उठवला.पण तरीही या महाशयांना वाचवण्यासाठी, ज्यांना या पासून फायदा होता असे महानग ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पण शेवटी सत्य जिंकले. सत्याचा विजय झाला. फक्त बदलीने समाधान न मानता यांची चौकशी होवून शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून असे धाडस पुन्हा कोणी ही करणार नाहीत अशी संत्पत भावना ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
आता गावातील तरूण, उच्च शिक्षित आणि गावाच्या विकासाचा विचार करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे की, पाच पाच वर्षे मलिदा खाणाऱ्या ग्रामसेवकांला सहकार्य करणाऱ्या धेंड्यांना शोधून त्यांची ठेचून नांगी ठेचली पाहिजे. कोणाही व्यक्तीपेक्षा गाव नक्कीच मोठा असतो अशी प्रतिक्रीया सामाजीक कार्यकर्त रामदास पाटील यांनी व्यक्त केली आहे .