▪️बोगस शिक्षक भरतीच्या चौकशीसाठी समिती स्थापन
गेल्या तीन दिवसांपासून भ्रष्टाचार न्यू्ज चे संपादक श्री किशोर अरुण सोनवणे हे जळगाव जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळेत केलेल्या बोगस बॅक डेट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची आणि वेतन अधीक्षक कार्यालयातील बोगस बॅक डेट फरकबील काढून घेणे याबाबतच्या चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याच्या, शिक्षण खात्यातील कर्मचारी यांच्या बदली करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले होते. शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी पहिल्या दिवशी त्यान्ची उपोषणस्थळी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि चौकशी समिती स्थापन करत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही (JSN) असं किशोर सोनवणे यांनी ठणकावून सांगितलं होतं. यामुळे जळगाव शिक्षण खात्याची चांगलीच पळापळ झाल्याचे समजते. त्यानंतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या उपोषणाची चर्चा सुरु झाल्याने शिक्षण विभागावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. आणि दररोज नवनवीन घोटाळे व भ्रष्टाचार या जळगाव जिल्हा माध्यमिक विभागाचे उघडकीस येत आहेत.
त्यानंतर आज उपशिक्षण अधिकारी श्री शेख साहेब व त्त्यांच्या टीमने उपोषण स्थळी श्री किशोर अरुण सोनवणे यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत त्यांनी मागणी केलेल्या शाळांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केल्याची घोषणा केली आहे.