प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वराडसीम विविध कार्यकारी सोसायटीचा पंचवार्षीक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सुरवातीला उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले अर्जांची छाननी झाल्या नंतर १३ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल होते आणि दि.११ मार्च रोजी माघारीची तारीख आहे या दरम्यान गावातील सुज्ञ पदाधिकारी यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करुन गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा यासाठी जिद्द कायम ठेवली या दरम्यान दि.७ रोजी उर्वरीत अर्जदारांनी आपले दोन अर्ज माघारी घेतल्याने आता १३ जागांसाठी १३ अर्ज दाखल असल्याने एक प्रकारे निवडणूक बिनविरोध झाली आहे.
या बाबत अधिकृत घोषणा बाकी आहे कारण ही यादी निवडणूक नियमानुसार माघारीची तारीख संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वराडसीम हे गाव ग्रामिण भागात मोठ्या लोक संख्येचे गाव आहे आणि एकेकाळी सोसायटी अवसायनात जाते की काय ? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता मात्र विकासोचे सचिव धनगर आप्पा यांनी या सोसायटीची घडी बसवली हे निर्विवाद सत्य आहे आणि अशा गावातून विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध होणार या गोष्टीवर अनेकांचा विश्वास बसत नसला तरी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ज्या पदाधिकाऱ्यांनी मनापासून प्रयत्न केले ते सर्व पदाधिकारी अभिनंदनास पात्र असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले आहे.