अक्षय शिंदेवर 7 दिवसानंतर अंत्यसंस्कार ? जागा ठरली! ना बदलापूर ना अंबरनाथ ‘या’ ठिकाणी होणार दफन

0
48

मुंबई -: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल. त्याला आता सात दिवस झाले आहे. मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अजून ही जागा मिळालेली नाही.

बदलापूर बरोबरच अंबरनाथमध्ये ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी विरोध केला. स्मशानभूमी बाहेर त्याबाबतचे बॅनरही झळकले. तर कोर्टात पोलिसांनी सोमवारपर्यंत अंत्यसंस्कार केले जातील असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आहेत. त्यानुसार आता अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याला दफन केले जाणार आहे. मात्र हे अंत्यसंस्कार बदलापूर किंवा अंबरनाथमध्ये होणार नाहीत. तर ते त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. ती जागाही ठरली आहे.

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरला 7 दिवस उलटूनही अद्याप त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नव्हती. राज्य सरकारने अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही हायकोर्टात दिली होती. त्यामुळे अंत्यविधीबाबत सरकारला रविवारीच अंतिम पावलं उचलणे गरजेचे होते. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये होणारा विरोध लक्षात घेता त्याच्यावर तिसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार अक्षय शिंदेवर उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.पोलिसांनी त्याला दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खड्डा ही खोदण्यात आला आहे.

अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला होता. अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती. यानंतर अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेने त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला आहे. याबाबत स्मशानभूमी बाहेर शिवसेनेने बॅनर सुद्धा लावला आहे.तर दुसरीकडे बदलापूर नगरपालिकेने पोलिसांना काही जागा सुचवल्या होत्या. पण अंतिम निर्णय होवू शकला नाही. शेवटी पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला दफन केलं जाणार आहे. त्याची सर्व तयारी पोलिसांनी केली आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाले होते. या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. त्यावर तातडीने कारवाई अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी बदलापूर स्टेशनमध्ये नागरीकांचा उद्रेक झाला होता. त्या शाळेचीही तोडफोड झाली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. या प्रकरणी सरकारवरही दबाव होता. अखेर तळोजा कारागृहातून ठाण्याला घेवून जाताना अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. त्यात तो जागीच ठार झाला. त्यानंतर आता पर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नव्हती. शेवटी अक्षयचे पालक कोर्टात धावले. कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Spread the love