अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी, अध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थित जामनेर शहर, तालुका कार्यकारिणी जाहीर….. 

0
201

हेमकांत गायकवाड

जामनेर: अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी, संस्थापक अध्यक्ष शिरीषकुमार जाधव व राज्य अध्यक्ष शेखर जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव जिल्ह्यातील जामनेर (विशाल लाँन्स) येथे तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैकाडी समाजाचे दैवत श्री संत राजाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून महाराजची जय,कैकाडी समाजाचे घोष वाक्य जय कुळो जय कुळो हे म्हणत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात केली.खान्देश संपर्क प्रमुख मुकेश जाधव,जळगाव जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव,जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष मुकेश जाधव,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभाताई गायकवाड,यांनी मार्गदर्शन केले व सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार केला. कैकाडी समाज आघाडी युवा जामनेर तालुका उपाध्यक्ष पदी सागर गायकवाड यांची निवड करण्यात आली. जामनेर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांचा कैकाडी समाज आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश संपर्कप्रमुख मुकेश जाधव होते व त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की जामनेर तालुक्यातील प्रत्येक समाज बांधवानकडे जाऊन, माहिती विचारणे, रेशन कार्ड ,आधार कार्ड आहे किंवा नाही. याबाबत विचारणा करणे,आपल्या समाजातील अनाथ,बेघर,अपंग,विधवा, जेष्ठ नागरिक लोकांचे संजय गांधी, श्रावण बाळ, राजीव गांधी,व इतर शासनाच्या योजनेचा लाभ मिळुन देणे, पंचायत समितीत, नगरपरिषद येथे,जाऊन दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी काढणे, आपल्या समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू,वह्या ,पेन ,गणवेश वाटप करणे,समाजातील आथिर्क दुर्बल कुटुंबाला आर्थिकसाह्य पुरविणे,त्यांना अंधश्रद्धेच्या अंधारातुन शिक्षणाच्या उजेडात आणणे.जामनेर तालुक्यातील पदाधिकारी तालुका सचिव अजय जाधव,तालुका उपाध्यक्ष नवल जाधव, सदस्य अजय गायकवाड,सचिन जाधव हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका युवा अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी केले आभार व्यक्त जामनेर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केले. सदर बैठकीला जामनेर तालुक्यातील कैकाडी समाज बांधव ,बंधु,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love