अमर पाटील यांना पोलीस अधिक्षकांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान

0
11

जळगाव -: तालुक्यातील ममुराबाद येथील माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य श्री अमर गंगाराम पाटील यांना दिनांक 17 जुन रोजी पोलीस अधिक्षक डॉ माहेश्वर रेड्डी यांचे हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

वेळोवेळी पोलीसांना मदत करणे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवीणे.आव्हानात्मक तसेच गुंतागुंतीचे तपासकामी पोलीसांना सहकार्य करणे. अशा अनेक उत्कृष्ठ कामांसाठी पोलीस प्रशासनाला मदत केल्याबद्दल पो अधिक्षक डॉ माहेश्वर रेड्डी यांनी अमर पाटील यांना प्रशंसापत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. अमर पाटील यांनी केलेल्या कामाचा पोलीस दलाला अभीमान आहे.आपण भावी काळात असेच उत्कृष्ट कर्तव्य बजावीत राहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल असे देखील पो अधिक्षक डॉ माहेश्वर रेड्डी यांनी सांगीतले.

अमर पाटील यांना पोलीस दलाकडून प्रशंसापत्र प्रदान झाल्याने परिसरातुन त्यांचे कौतुक होत आहे.

Spread the love