सिन्नर – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केली.
ही घटना सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी रात्री अडीच वाजता घडली. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोलनाका संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
गोंदे टोल नाक्याजवळ उत्तर महाराष्ट्राचा दौरा संपवून अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर निषेध म्हणून टोल नाकाच फोडला. या सर्व घटनेची व्हिडिओ क्लीप सर्वत्र व्हायरल झाली आहे. त्यात मनसे कार्यकर्ते टोल नाक्याची तोडफोड करत असतांना घोषणा देत असल्याचेही समोर आले आहे. आठ ते दहा कार्यकर्त्यांनी अगोदर टोल नाक्यावरील कॅबिनला लक्ष केल्याचे दिसत आहे.
समृद्धी महामार्गावरील गोंदे इंटरचेंज तालुका सिन्नर येथील टोलनाक्यावर मनसैनिकांचा हल्लाबोल #nashik #mns #amit #thackeray #toll #naka #samruddhi #highway #sinner #mnvs #gonde pic.twitter.com/152AAx1G8I
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) July 23, 2023
MNS workers vandalised toll plaza at Samruddhi Mahamarg after MNS youth leader Amit Thackeray vehicles were stopped.This is condemnable act, but tolls are biggest digital fraud in India.People who genuinely believe in so called transparent toll system are systematically looted. pic.twitter.com/GztGZPpEsu
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) July 23, 2023