अमृता फडणवीस यांनी सुषमा अंधारे यांना फोन करून केली विचारपूस

0
51

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाला आहे, मिळलेल्या माहितीनुसार, सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत.

या घटनेचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. सुषमा अंधारेंनी सांगितले,’हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते.यादरम्यान ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले.’

या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्याला अनेकांनी फोन केल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा सुषमा अंधारे यांना फोन करुन विचारपूस केली

 

Spread the love