सामान्य कार्यकर्त्याच्या निवासस्थानी शरदचंद्रजी पवार साहेबांनी भेट द्यावी असे उर्वेश साळुंखे यांनी लिहिलेले भावनिक पत्र

0
9

चोपडा – येथील रहिवासी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांना भावनिक पत्र लिहिले आहे‌‌.

पत्रात असा उल्लेख केला आहे की, आदरणीय साहेब आपण जेव्हा पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा मी उर्वेश साळुंखे आपण घेतलेल्या निर्णय मागे घ्यावा असे रक्ताने पत्र लिहिले होते. त्या दिवास पासुन माझे स्वप्न होते की, ज्या वेळेस साहेब जळगाव जिल्हा दौऱ्यावर येतील तेव्हा मी साहेबांना माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट द्यावी असे आमंत्रण देईल‌‌.
अमळनेर दौऱ्यावर १६ तारखेला एका कार्यक्रमानिमित्त शरदचंद्रजी पवार साहेब येत आहे. हे लक्षात घेता उर्वेश साळुंखे यांनी पत्र लिहिले. साहेब मी सामान्य कार्यकर्ता आहे. आपणास हात-पाय जोडून विनंती आहे की आपण एक सामान्य कार्यकर्त्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट द्यावी. व एक सामान्य कार्यकर्त्याच स्वप्न पूर्ण करावं. आपण एक सामान्य कार्यकर्ताच स्वप्न मोडू नये अशी आपणास विनंती असा पत्रात उल्लेख केला आहे.

Spread the love