आंघोळीला गेलेल्या मामा भाच्याचा तापी नदीत बुडुन मृत्यु

0
25

 

भुसावळ -: येथे देवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या जालन्यातील मामा-भाच्याचा तापी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.21) सकाळी घडली. रामराजे नातेकर (वय 55) आणि त्यांचा भाचा आर्यन काळे (वय 21, दोघेही रा. जालना) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही भुसावळ शहरातील राहुल नगर परिसरातील तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रामराजे नातेकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे, तर आर्यन काळे मागे आई-वडील व भाऊ असा परिवार सोडून गेला. दोन्ही कुटुंबीयांचे हातमजुरीवर उदरनिर्वाह सुरू होता. या दुर्दैवी घटनेची नोंद भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Spread the love