जळगाव (प्रतिनिधी)- खाजगी व शासकीय पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आज सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन करून धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.यावेळी जिल्ह्यातील सर्व पशु पदविका धारकांचे राज्यव्यापी पदाधिकारी पस्थित राहून जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देणार आहे.
खाजगी लघु पशु वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांच्या विविध मागण्या गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे.यावेळी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील यावर कुठलीही उपाययोजना होत नसल्याने 15 जुलैपासून पशु चिकित्सक व्यवसायिक संघटना महाराष्ट्र व खाजगी पशुचिकित्सक संघटना महाराष्ट्र यांच्या तर्फे राज्यभरात बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. याबाबत आमच्या विविध मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पशु पदविका धारक संघटनेचे पदाधिकारी निवेदन देणार आहे.तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सोमवारी सकाळी 11 वाजता ही करण्यात येणार आहे. या आंदोलनात ठिकाणी कोरोना संसर्ग जन्य आजाराच्या संदर्भात सर्व नियम पाडून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या आंदोलनाला जिल्ह्यातील पशु पदविकाधारकांचे पदाधिकारी व डॉक्टर्स यांनी उपस्थित रहावे असे आव्हान खाजगी पशु वैद्यकीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपक लोखंडे,शासकीय पशु वैद्यकिय संघटना अध्यक्ष डॉक्टर हेमंरात पाटील यांनी केले आहे.