राष्ट्रीय महामार्ग आता सुविधासज्ज – गडकरी; ‘हमसफर’ धोरणाची घोषणा

0
24

नवी दिल्ली -: देशातील राष्ट्रीय महामार्गांवर स्वच्छतागृहे, बाल संगोपन कक्ष यासह इतर अनेक सुविधांना सुसज्ज करणाऱ्या ‘हमसफर धोरणा’ची केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी घोषणा केली.

हमसफर धोरणानुसार, देशातील राष्ट्रीय महामार्गांवर अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. यात स्वच्छ प्रसाधनगृहे, बाल संगोपन कक्ष, व्हीलचेअर, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र, वाहनतळ आणि पेट्रोल पंपांवर निवासाची सुविधा यांचा समावेश आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सोयीच्या आणि सुरक्षित अशा या सुविधा असतील. त्यांचा प्रवासाचा अनुभव या माध्यमातून आनंददायी करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचबरोबर यातून स्वयंउद्योजकतेला बळ मिळून रोजगार निर्मिती होईल. तसेच, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा आणि आराम या गोष्टींशी ‘हमसफर’ सुविधा जोडल्या जातील. देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर उच्च गुणवत्ता आणि चांगल्या दर्जाच्या सेवा पुरविण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हे धोरण आखले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील जागतिक दर्जाच्या महामार्गांच्या जाळ्यावर यातून अनेक अभिनव सुविधा प्रवासी आणि चालकांना मिळतील.

Spread the love