प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे महाकुंभ तिर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रयागराज येथे १४४ वर्षानंतर झालेल्या महाकुंभात जगभरातून करोडो लोकं येऊन त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून गेले व या सर्वांनी समरसतेचा अनुभव घेतला. या तीर्थदर्शन सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक समरसता जोपासली जावी, आम्ही सर्व एकाच आईची मुलं आहोत व त्यानात्याने आम्ही एकमेकांचे बंधु आहोत हा भाव वृद्धिंगत व्हावा असा हेतू आहे.
यासाठी त्या भागातील/गावातील प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी म्हणून एक एक जोडपे व अन्य मंडळी या सोहळ्यात सहभागी व्हावेत असा प्रयत्न आपण केला आहे. या सोहळ्यात एकूण 11 जोडप्यांच्या हस्ते तीर्थकलशाचे पूजन मंत्रोच्चारात करण्यात आले. सुरवातीला प्रविण दांडगे यांनी प्रास्ताविक केले. वस्तीमित्र श्री. विष्णू बाणाईत यांनी सर्व जोडप्यांचा परिचय करून दिला. पुरोहित श्री. राजेंद्र जोशी यांनी विधिवत सर्व जोडप्यांकडून पूजन करून घेतले. प्रमुख वक्ते हभप श्री. जितेंद्र नेमाडे महाराज यांनी विषय मांडणी केली. समरसता मंत्र सर्वांनी म्हटला. शेवटी आरती झाली. सर्व जोडप्यांनी आणलेला प्रसाद एकत्र करून तो सर्वांना वाटून कार्यक्रम संपन्न झाला.