‘क्या कूल है हम’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘यमला पगला दिवाना 2’ या चित्रपटांचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
लेखक, दिग्दर्शक संगीत सिवन यांनी बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीत देखील नशीब आजमावले होते. त्यांनी मोहनलाल यांच्यासोबत ‘योद्धा’, ‘गंधर्वम’ आणि ‘निर्णयम’ या तीन चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना रितेश देशमुख म्हणाला, ‘संगीत सिवन सर आता आमच्यात नाहीत, हे खूप दुःखद आहे. नवोदित म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली. ‘क्या कूल है हम’ आणि ‘अपना सपना मनी-मनी’मध्ये मला संधी दिल्याबद्दल त्यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. मी त्यांचे स्मितहास्य मिस करेन. त्यांच्या पत्नी, भाऊ आणि मुलांप्रती माझ्या सहवेदना.’










