भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते तसेच भुसावळ पंचायत समितीच्या माजी सभापती मनिषाताई पाटील यांचे पती भालचंद्र पाटील यांची जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी च्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अगोदर भुसावळ तालुकाध्यक्ष पद चांगल्याप्रकारे सांभाळून जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे आता भुसावळ तालुका भाजपा तालुकाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याकडे कार्यकर्ते मंडळीचे लक्ष लागले आहे.