चोपडा – तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील सामा.कार्यकर्ते व स्वामी विवेकानंद सार्व. ग्रंथालयाचे सदस्य भगवान लक्ष्मण सोनवणे यांची प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.भगवान सोनवणे हे एन्.टी.प्रवर्गातील कार्यकर्ते असून याआधी त्यांनी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुकाध्यक्ष पदही भूषविले आहे.ते वैदू समाज विकास मंचचे प्रदेश सदस्य असून त्यांनी आतापर्यंत तालुक्यातील अपंग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे. लवकरच तालुक्यातील अपंग बांधवांना एकत्रीत करून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या गांववॉईज शाखा स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे. नुकतेच त्यांना संस्थेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.त्यांच्या या निवडीबद्दल गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष प्रशांत सोनवणे,कार्याध्यक्ष सचिन धनगर,प्रसिद्धीप्रमुख तनवीर पिंजारी,सोशल मीडिया प्रमुख विलेश बारेला, संपर्कप्रमुख विठ्ठल पाटील, सदस्य नितीन कोळी,भुपेंद्र कोळी आदिंनी अभिनंदन केले आहे.












