अडावद – दि.16/3/2024 रोजी सर्वाधिक सदस्य संख्या असलेली पत्रकारांची एकमेव संघटना,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या शहर अध्यक्ष (प्रिंट मीडिया विभाग) अडावद ता. चोपडा या पदावर अडावद येथील सायं दैनिक एकता चे संपादक महेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य महासचिव डॉ. विश्वासराय आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ३१ मार्च २०२५ पर्यंत नियुक्ती करण्यात आली असून आपण संघटनेच्या नियम व अटीना अधीन राहून पत्रकार हिताच्या दृष्टीने काम करावे. समाजाचं देणं लागतं या भावनेतून पत्रकार संघाच्या माध्यमातून पुढील वाटचाल करावी, आपल्यातील क्षमता व कार्याची दखल घेऊन आपणास ही जबाबदारी देण्यात आली.