नशिराबाद पोलीस स्टेशन प्रभारी सपोनि पदी योगीता नारखेडे यांची नियुक्ती !

0
21

प्रतिनिधी -जितेंद्र काटे 

भुसावळ – येथून जवळच असलेल्या नशिराबाद पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी जळगाव वाहतूक शाखा येथून बदली होऊन योगीता नारखेडे मॅडम यांनी पदभार स्विकारला. नशिराबाद येथे असलेले सपोनि आसाराम मनोरे साहेब यांनी त्यांच्या काळात नशिराबाद येथील धार्मिक सण ,उत्सव,नगर परिषद निवडणूक तसेच सामाजिक सलोखा राखत त्यांच्या काळात शांततेत काम केले. विशेष म्हणजे सपोनि आसाराम मनोरे यांची पदोन्नती झाल्याची माहिती मिळाली आहे. योगीता नारखेडे यांची नशिराबाद पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी नियुक्ती झाल्या बद्दल भादली येथील महिला पोलीस पाटील ऍड .राधिका ढाके यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सर्व गावात सामाजिक सलोखा तसेच सर्व जाती धर्माचे सण ,उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी व सर्व गावांमध्ये तंटामुक्ती समिती व पोलीस पाटील, पदाधिकारी यांच्या संपर्कात राहून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Spread the love