सुनसगाव पोलीस पाटील पदी खुशाल पाटील यांची नियुक्ती

0
41

सुनसगाव – येथील पोलीस पाटील प्रकाश मालचे हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असल्याने पोलिस पाटील पद दोन – तीन वर्षांपासून रिक्त होते येथील कार्यभार गोंभी येथील पोलीस पाटील वैशाली प्रमोद पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र शासनाने पोलीस पाटील पदासाठी भरती केल्याने रिक्त जागेवर येथील रहिवाशी खुशाल लक्ष्मण पाटील यांची वर्णी लागली आहे.

खुशाल पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल भुसावळ येथील प्रथित यशतज्ञ डॉ. जयंत धांडे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सतिश पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश सपकाळे, लिलाधर पाटील, राहुल पाटील, किशोर नारखेडे गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सत्कार केला. यावेळी गावात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व गावात सदैव शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी सांगितले. तसेच कायद्या पेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळे कायद्यात राहील तो फायद्यात राहील असे सांगत सर्व नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Spread the love