जळगाव -: तालुक्यातील ममुराबाद येथे आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास चोपड्याहून जळगावकडे येणाऱ्या बस चालकाचा मनमानी कारभार पाहायला मिळाला. ममुराबाद येथे बस थांबविण्याची विनंती काही तरुणांनी चालकाला केली होती. मात्र, चालकाने बस थांबवण्यास नकार दिला.

यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर बस थांबवली. तरीही चालकाने ऐकण्याची तयारी न दाखवता नागरिकांना शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर “गाडीच्या पुढे या, तुम्हाला उडवून देईन” अशा धमकीच्या स्वरूपाची भाषा त्याने वापरल्याचेही नागरिकांनी सांगितले.
या घटनेमुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि वाहतूकही खोळंबली होती. या प्रकाराबाबत संबंधित प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











