सुनसगाव येथे गोबरगॅस च्या खड्यात पडलेल्या गायीला क्रेन ने काढून जिवदान !

0
62

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे गुरांच्या गोठ्यात असलेल्या गोबरगॅस च्या खड्ड्यात अचानक गाय पडल्याने जखमी गायीला क्रेन च्या सहाय्याने काढून जिवदान दिल्याची घटना घडली.

या बाबत माहिती अशी की , सुनसगाव येथील श्री हनुमान मंदीरा जवळ माजी सरपंच कै.केशव भोळे यांचा गुरांचा गोठा आहे या गोठ्यात जूना गोबरगॅस चा खड्डा आहे.या वाड्याला लागून गलू पुंडलिक धांडे यांचे राहते घर असून घरा जवळ गाय बांधलेली असते.दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी गलू धांडे यांचे कुटूंब शेतात गेले असताना गाय अचानक सुटून या वाड्यात गेली असता चुकून गोबरगॅस च्या जुन्या जवळपास १२ फूट खोल खड्यात पडली. गाय गोबरगॅस च्या खड्ड्यात पडल्याचे समजताच प्रत्यक्षदर्शींनी गलू धांडे व किशोर धांडे यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर नशिराबाद येथील राजू माळी यांच्या जय मुंजोबा क्रेन सर्व्हीस यांच्याशी संपर्क साधला आणि अथक परिश्रमा नंतर गायीला बाहेर काढण्यात आले.या अगोदर काही वर्षापुर्वी याच खड्यात पाय घसरुन केशव भोळे यांच्या पत्नी पडल्या होत्या त्यावेळी संदिप धांडे या युवकाने या गोबरगॅस च्या खड्यात उतरुन त्या महिलेचा जिव वाचवला होता त्यामुळे आतातरी हा रिकामा असलेला खड्डा लवकरात लवकर बुजण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. एखाद्या वेळी लहान बालक जर यदाकदाचित या खड्यात पडले आणि काही अघटित घटना घडली तर जबाबदार कोण ? राहणार असे बोलले जात आहे. यावेळी गावातील सर्पमित्र अजय खरोटे व प्राणी मित्र व ग्रामस्थांनी सहकार्य केले तर ही घटना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Spread the love