पोलीस यंत्रणेला मदत करणारा टेलीफोन खांब चोरीचा प्रयत्न?

0
38

सुनसगाव – येथून नशिराबाद कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाघुर नदीच्या पुलाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून टेलीफोन खांब उभा आहे विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूला हे टेलीफोन खांब उभे आहेत . मात्र अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने हा खांब वाकवून ठेवला आहे.मात्र आता एक ना एक दिवस हा खांब येथून बेपत्ता होण्याच्या मार्गावर आहे.

सुरवातीला सुनसगाव येथे नशिराबाद टेलिफोन आॅफिस मधून फोन सेवा देण्यात आलेली होती .मग हळूहळू ओएफसी सुरू झाली आणि आता तर पुर्णपणे टेलिफोन सेवा विस्कळित झाली आहे.सुरवातीच्या काळात पुलावर दोन्ही बाजूला टेलिफोन खांब टाकून वायर टाकण्यात आलेली होती.नंतर या पुलावर श्री गणेश विसर्जन व श्री नवदुर्गा विसर्जन करण्यात येत असल्याने नशिराबाद पोलीस या खांबावर दोन्ही बाजूला लाईट व्यवस्था सुरू करीत होते.लाईट लावण्यासाठी हे खांब महत्त्वाचे ठरत होते व विसर्जन वेळी एखादी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हे खांब लाईट लावण्यासाठी महत्त्वाचे ठरत होते. मात्र आता अज्ञात चोरट्यांनी हा टेलिफोन खांब चोरी करण्याच्या उद्देशाने वाकवलेला आहे.

Spread the love