ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य पदाधिकार्यांची राज्यस्तरीय बैठक
जळगाव-:दि.१९/१०/२०२२ रोजी ठाकुर द्वार चैनी रोड मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राष्ट्रीय कामगार नेते स्व. शरद जी राव साहेब यांनी स्थापन केलेल्या ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती महाराष्ट्र राज्याच्या (खान्देश विभाग )कार्याध्यक्ष पदी नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष / आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष आदिवासी कामगार नेते प्रल्हाद सोनवणे यांची ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄतीस मितीचे प्रदेश अध्यक्ष श्री. शशांक जी राव साहेब तसेच सरचिटणीस श्री. विलास जी भालेकर साहेब यांनी नियुक्ती केली . प्रल्हाद सोनवणे राष्ट्रीय कामगार नेते स्वर्गिय शरद जी राव साहेब आदरणीय डॉ. बाबा आढाव साहेब यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा , खांन्देश विभागासह महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालक मालकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजे त्यांचा विकास व्हावा यासाठी नेहमी निस्वार्थ पणे कार्य करीत आहेत प्रल्हाद सोनवणे यांचा ऑटोरिक्षा चालक ते नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन संस्थापक अध्यक्ष , ऑटो रिक्षा कॄती समिती प्रदेश उपाध्यक्ष आता कार्याध्यक्ष असा सामाजिक प्रवास सुरू आहे ऑटो रिक्षा चालकांच्या भविष्यासाठी शासनाने परिवहन खात्या अंतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करून रिक्षा चालकांना पेन्शन , उपदान, भविष्य निर्वाह निधी, १० लाखांचे सुरक्षा कवच असलेली आरोग्य विमा योजना , अपघात विमा योजना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत . त्यांची खांन्देश विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने येणाऱ्या काळातऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समितीच्या माध्यमातून राज्यातील तसेच जळगाव जिल्हा व खान्देश विभागातील सर्व रिक्षा संघटनांना , पदाधिकारी व रिक्षा चालक मालकांना विश्वासात घेऊन संघटीत करून त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करतील. नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष (खान्देश विभाग )प्रल्हाद भाऊ सोनवणे यांच्या नियुक्ती चे ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा. शशांक जी राव साहेब प्रदेश सरचिटणीस मा. विलास जी भालेकर साहेब जेष्ठ मार्गदर्शक मा. शंकरजी साळवी साहेब कोकण विभाग कार्याध्यक्ष मारुती कोंडे मराठवाडा विभागअहमद बाबा बागवाले विदर्भ विभाग नरेंद्र वाघमारे नवी मुंबई रिक्षा, टॅक्सी संघटना संयुक्त कॄती समिती चे अध्यक्ष भरतजी नाईक , अकोला जिल्हा अध्यक्ष इलियास खान लोधी, सांगली जिल्हा अध्यक्ष, सुरेश गलांडे, परभणी जिल्हा अध्यक्ष मिर्झा इद्रिस कल्याण जिल्हा अध्यक्ष मल्हारी गायकवाड,नाशिक जिल्हा अध्यक्ष किशोर खडताळे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी , सचिव सुनील जाधव नंदुरबार जिल्हाध्यक्ष किरण गवळी भुसावळ अध्यक्ष तसलीम खान रेल्वे स्टेशन अध्यक्ष छोटू निकम , कैलास प्रमोद वाणी , सोनवणे , संदिप वाणी , ताराचंद पाटील , राजु कोळी , रविंद्र कोळी, योगेश्वर कोळी , योगेश बागडे प्रकाश जाधव किशोर साळूंके , भैय्यासाहेब पेंटर पद्माकर पाटील सुनील चौधरी
यांच्या सह रयत रिक्षा संघटना कल्याण राहुल वारे प्रदीप माने , सोलापूर जिल्हा रिक्षा संघटनेचे सलीमभाई मुल्ला,भाजपा वाहतूक संघटना अध्यक्ष कल्याण विल्सन काळपुंड, चंद्रकांत वडतीले, अंबादास पारसे, विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन महासचिव राजू भाऊ इंगळे, टाइगर ऑटो रिक्शा संघटना अध्यक्ष जवेद शेख ,एकता ऑटो यूनियन अकोला अध्यक्ष साकिर भाई शेख,नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस सुनील बोर्डे, खजिनदार विजय पाटिल , राष्ट्रवादी रिक्षा चालक संघटना महेश राऊत नाशिक जिल्हा रिक्षा संघटनेचे संजय गांगुर्डे, यांच्या सह राज्यासह खान्देश विभाग व जळगाव जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व रिक्षा चालक मालकांनी अभिनंदन केले आहे