आव्हाने शिवारात वाळू माफियांना बेदम मारहाण.

0
39

जळगाव-: जिल्ह्यात गिरणा नदीपात्रातून सर्रासपणे वाळूचे उत्खनन होत आहे. वाळू माफियांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आव्हाणे येथे स्थानिक ग्रामस्थांनी वाळू वाहतूक करणाऱ्यांना पकडून बेदम मारहाण केल्याची घटना आज घडली. यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

आव्हाणे फाट्याजवळील माऊली हॉटेलजवळ प्रचंड गोंधळ उडाला आहे. वाळू वाहतूकीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. वाळू वाहतूक करणारे आणि त्यांचे काही पंटरांना ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप दिला. तसेच त्यांना कोंबून ठेवले आहे. मात्र पोलिस अद्याप त्याठिकाणी पोलीस हजर न झाल्याने येथील नागरीकांन कडुन शंका व्यक्त केली जात आहे. पोलिस व काही राजकीय पुढार्‍यांनकडुन वाळू माफियांना अभय मिळत असल्याचे देखील ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.

Spread the love