जळगाव -तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हाना येथे पोलिसांनी जुगार अड्यांवर धाडी टाकून दोन जणांना अटक करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील आव्हाना येथील यशवंत कृष्णा सोनवणे हे जुगारअड्डा चालवित असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.विजय दुसाने ,दिपक कोळी , उमेश ठाकुर, दिनेश पाटिल,पोक महे़ंद्र सोनवणे,शाम पाटिल व सहकाऱ्यांनी याठकाणी छापा टाकला. यावेळी यशवंत कृष्णा सोनवणे हा मटका सट्टा जुगाराचे साधना सह मिळून आल्याने मु जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल
तर, दुसऱ्या कारवाई मध्ये आव्हाना येथील कैलास मंगल सपकाळे याच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.