प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव – वराडसिम रस्त्यावर काम सुरू झाले असल्याचे दिसून येत असून या रस्त्यावर माती मिश्रीत खडी टाकल्याने वराडसिम ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते त्यामुळे आमदारांच्या नावाखाली हे लोक निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या बाबत वराडसिम येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने सुनसगाव येथील आमदारांच्या एका कार्यकर्त्याला सांगितले आहे मात्र काम कसे होते यावर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.









