प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – येथील तापी नदीच्या पुला शेजारी असलेल्या राहुल नगरातील इसम बकऱ्या चारण्यासाठी गेला असता तापी नदीपात्रात वाहून मयत झाल्याची घटना समोर आली असून या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत राहुल कांतीलाल गाढे रा.राहुल नगर तापी पुलाजवळ यांनी फिर्याद दिली की ,दि.२४ /९/२०२५ रोजी सकाळी ११:३० वाजे दरम्यान वडील कांतीलाल गाढे ( वय ५७ ) हे तापी पुला जवळील जुना पूल मंशाली माता मंदीरा जवळ बकऱ्या चारत असताना काही बकऱ्या पाण्यात उतरल्याने त्या बकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरले असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असता त्यांचा मृतदेह भानखेडा ता भुसावळ शिवारात नदी काठी सापडला अशी फिर्याद दिली आहे. त्यामुळे तालुका पोलीसात अ.मृ.००/२५ बीएएनएस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. हेमंत मिटकरी तपास करीत आहेत.