राज्यातील सर्व शाळेत दाखवला जाणार ‘बलोच’ चित्रपट!

0
50

शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली परवानगी

सीमेपार लढलेल्या मराठयांच्या असीम धैर्याचा,शौर्याचा आणि कर्तृत्वाच्या रणसंग्रामाची गाथा ‘बलोच’ या मराठी चित्रपटात दाखवण्यात आली आहे.आता हा चित्रपट राज्यातील सर्व शाळेमध्ये दाखवण्यात येणार आहे.प्रकाश जनार्दन पवार, विश्वगुंज पिक्चर्स, पुणे यांनी बलोच हा मराठी चित्रपट राज्यातील शाळांमध्ये दाखविण्यात यावी अशी विनंती शासनाकडे केली होती.

त्यानंतर आज शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे.इतिहासात सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. बलोच चित्रपटाबाबत काही अटी घालत २०२३-२४ या एक वर्षापूर्ती राज्यातील शाळेंमध्ये दाखवण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

Spread the love