दिवाळीचा बाजार करूण घरी येत असतांना ४८ वर्षीय इसमाचा मृत्यु

0
46

यावल – दिवाळीचा बाजार करायला गेलेल्या डिकसाई येथाल अठ्ठेचाळीस वर्षीय इसमाचा आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास किनगाव डांभूर्णी रस्त्यालगत अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की डिकसाई तालुका जळगाव येथील रहिवाशी निंबा चव्हाण हे अठ्ठेचाळीस वर्षीय इसम दिवाळीचा बाजार करायला किनगावला गेला होता बाजार करूण झाल्यावर घरी परतत असतांना किनगाव डांभुर्णी रस्त्यावर समोरुण येणाऱ्या ट्रकने निंबा चव्हाण यांच्या दुचाकीला समोरुन धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. सदर घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्ता वाहातुकीसाठी मोकळा केला. व निंबा चव्हाण यांचा मृतदेह रुग्नालयात हलवण्यात आला आहे. उशीरा पर्यन्त गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Spread the love