राजस्थान – पाली जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका बापाने आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील फिल्म दाखवून तिचा विनयभंग केला. मुलीने आईला याची माहिती दिल्यावर तिने मुलीसह पोलीस ठाणे गाठून आरोपी पतीविरोधात एफआयआर दाखल केला.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करुन न्यायालयात हजर केले, तेथून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
वास्तविक, हे प्रकरण पाली शहरातील इंडस्ट्रियल टाऊन पोलिस स्टेशन हद्दीशी संबंधित आहे. 21 ऑगस्ट रोजी एका महिलेने इंडस्ट्रियल टाऊन पोलिस ठाण्यात तक्रार दिली, ज्यामध्ये तिने सांगितले की, तिचा पती एका खाजगी शाळेत शिक्षक आहे, तर ती मजुरीचे काम करते. त्यांना तीन मुलेही आहेत. दोन दिवसांपूर्वी ती कामावर गेली होती, पती घरीच होते.
14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
पतीने आपल्या 14 वर्षांच्या मुलीला मोबाईलवर अश्लील फिल्म दाखवून तिचा विनयभंग केला. यावेळी घरातील त्यांची इतर दोन मुले खेळण्यासाठी बाहेर गेली होती. मुलगी घरात एकटीच होती. संध्याकाळी कामावरुन परतल्यावर मुलीने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. याबाबत तिने पतीला विचारले असता त्यांच्यात भांडण सुरु झाले. मी कोणाला काही सांगितले तर तुम्हा दोघांना जीवे मारेन, अशी धमकी पतीने दिली होती.
पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करुन तुरुंगात पाठवले
दरम्यान, रात्री पत्नी मुलीसोबत शांतपणे झोपली, मात्र तिने सकाळी मुलीसह पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
सध्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. बांगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.












