बीएएसएफ चा कपाशी पीक परिसंवाद – चारसूत्री व्यवस्थापन वर केले मार्गदर्शन 

0
55

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – चोपडा येथील अक्कासाहेब सौ.शरदचंद्रिका सुरेश पाटील नगरपालिका नाट्यगृह चोपडा येथे बीएएसएफ कंपनी मार्फत महाचर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी विवेक पाटील व सिद्धार्थ वाजगे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकामध्ये रसशोषक किडी व गुलाबी बोंड अळी करिता ४५ – ५५ – ६५ – ७५ चारसूत्री व्यवस्थापन वर मार्गदर्शन केले. केळी वरील करपा थांबवण्या करिता मार्गदर्शन केले पपई,कांदा, मका या पिकांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येण्यासाठी कोणत्या औषधीचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दिनानाथ इंगळे आणि योगेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले व सर्व बीएएसएफ जळगाव प्रतिनिधी यांनी सहकार्य केले यावेळी चोपडा व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Spread the love