बेकायद्याशीर पंप चालकास जिल्हाधिकारी यांची नोटीस

0
17

दिपक नेवे

यावल येथील शहरातील आठवडे बाजार शेजारील शासनाची सि.स.नं. ३८५१/अ या जागेचा ९० वर्षाचा करार संपुष्टात येऊन ही या जागेवर अनधिकृतरित्या पेट्रोल पंप सुरू आहे.याशिवाय या जागेवर पेट्रोल पंपाचे मंजूर आराखडयामध्ये विनापरवानगीने बदल करण्यात आला आहे. सदर पंपचा वाणिज्य प्रयोजनार्थ सुरु असलेला बिनशेती वापर बंद का करण्यात येऊ नये ? अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीसह, पंप चालक शंकरलाल रामरतन अँड ब्रदर्स, व राजेंद्र राधाकृष्ण जाखेटे यांना नुकतीच (ता.४) बजावण्यात आली आहे.तसेच सदर जागेसंदर्भात शर्तभंग झाला असून सि.स.नं. ३८५१/ अ ही ४२९१४ चौ.मि. जागा सरकार जमा का करण्यात येऊ नये याविषयी येत्या पंधरा दिवसात खुलासा करण्याची नोटीस येथील पालिका मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन बजावण्यात आली आहे. तर सदर पेट्रोल पंप चालक राजेंद्र जाखेटे यांनी पेट्रोल पंप साठी कॅबीन, व शौचालय, सेफ्टी टॅक बांधकामासाठी वापरलेली चार ब्रास वाळू परवानगी न घेता अवैध वापरली आहे. सदर प्रकरणी पंप चालक राजेन्द्र जाखेटे व वाळू वाहतूकदार भागवत भिकन पाटील यांचे वर अवैध वाळू वाहतूकीबाबत वनविलंब कार्यवाही तत्काळ सुरू करावी असे आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी येथील तहसीलदारांना केले आहेत. अवैध पेट्रोल पंप संदर्भात येथील सामाजीक कार्यकर्ते शेख अलीम मोहंमद रफीक, शेख अजहर शेख शमसो६ीन, शेख रफीक शेख फारूक यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती या तक्रार निवेदनाची दखल घेत पंप संबधीतांना पंप चालकास नोटीस बजावण्यात आली असुन, यामुळे कुणी कुणी या पंपास पुनश्च कार्यरत करण्याकामी आर्थिक देवाण घेवाण केली आहे याची ही चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे .

Spread the love