प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाळ जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वर्गातील बहुतेक सगळ्या लहान मुलांचा त्यात सहभाग होता . छोट्या छोट्या मुलांना मुक्तपणे नृत्य करतांना बघणे, म्हणजे एक आनंदी वातावरण अनुभवणेच असते त्यामुळे साधारण एक महिनाभर आधी पासून प्रतिदिन एक ते दीड तास त्या सर्व मुलांचा सराव करून घेणे, हे कौशल्याचे काम वर्गातील शिक्षकांनी कसोशीने करून घेतले . यावेळी विद्यार्थ्यांनी हुबेहूब भूमिका केल्या तसेच लहानलहान विद्यार्थी गाण्याच्या चालीवर ठेका घेत असल्याचे पाहायला मिळाले प्रेक्षकांनी शिक्षकांचे आभार मानले तसेच किमान वर्षातून दोनवेळा असा कार्यक्रम करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शाळेतील कलाविष्कार कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक माळी सर व पढार सर यांनी परिश्रम घेतले तर गावातील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.