प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. उज्वला रमेश सोनवणे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे प्रभारी सरपंच पदी नितीन बोंडे हे कारभार सांभाळत होते परंतु दि.१८ रोजी सरपंच पदाची निवड झाली त्यात सरपंच पदासाठी सौ.मनिषा जितेंद्र खाचणे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता.
यावेळी प्रतिस्पर्धी अर्ज दाखल नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कुऱ्हा पानाचे मंडळ अधिकारी प्रविण पाटील यांनी मनिषा खाचणे यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली यावेळी ग्रामसेवक यांनी निवडणूक कामात सहकार्य केले तर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे कुऱ्हा दुरक्षेत्राचे पोउनि संजय कंखरे, पोहेकाँ योगेश पालवे, नखुले, पोलीस पाटील निलेश आंबेकर , होमगार्ड यांनी बंदोबस्त ठेवला निवडणूक शांततेत पार पडली. मिळालेल्या कालावधीत शक्य तेवढा गावाचा विकास करणार असून शासकिय योजना गरजू व ग्रामस्थांना मिळवून देणार तसेच वस्रोद्योग मंत्री ना. संजयभाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन गावाचा विकास करणार असल्याचे नवनियुक्त सरपंच मनिषा खाचणे यांनी जळगाव संदेशशी बोलताना सांगितले.