बेलव्हाळ महिला सरपंच उज्वला सोनवणे यांचा राजीनामा मंजूर ?

0
37

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाळ येथील सरपंच यांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला असून राजीनामा मंजूर झाल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

बेलव्हाळ येथील महिला सरपंच सौ उज्वला रमेश सोनवणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्या राजीनामा पत्रावर साक्षीदार म्हणून ग्रामपंचायत सदस्य सौ रोशनी विकास भंगाळे व सौ मनिषा जितेंद्र खाचणे यांच्या सह्या होत्या तसेच राजीनामा पत्र पंचायत समितीच्या टपालात टाकण्यात आले होते त्यामुळे राजीनामा पडताळणी साठी बेलव्हाळ ग्रामपंचायत कार्यालयात दि.६ जानेवारी २५ रोजी सभा बोलविण्यात आली होती त्या सभेत सरपंच यांनी मानसिकता चांगली नसल्याचे कारण देत तसेच साक्षीदार यांनी माझ्या समक्ष सह्या का केल्या नाहीत असे सांगत राजीनामा टाळण्याचा प्रयत्न केला होता.विशेष म्हणजे या सभेत काही ग्रामपंचायत सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे राजीनामा मंजूर होणार की नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले होते मात्र मुदतीच्या आत सरपंच उज्वला सोनवणे यांनी हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याने अखेर राजीनामा मंजूर करण्यात आला असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली आहे. आता ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दि.१० फेब्रुवारी रोजी तातडीची सभा घेण्यात येऊन सरपंच पदाची निवड होईल तो पर्यंत उपसरपंच नितीन गुणवंत बोंडे यांच्याकडे प्रभारी सरपंच पद सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या राजीनामा नाट्यावर आता पडदा पडला असून येणाऱ्या ७ ते ८ महिन्याच्या कालावधी साठी सरपंच पदासाठी कोणत्या महिला ग्रामपंचायत सदस्याची वर्णी लागणार या बाबत गावात खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत.

Spread the love