प्रतिनीधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ येथे दि. ९/१/२०२६ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळायेथे बाल आनंद मेळावा आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. मनीषा जितेंद्र खाचणे यांच्या हस्ते करण्यात आले. बाल आनंद मेळाव्यात एकूण २० स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तसेच त्यांना व्यवहारी ज्ञानाचे धडे मिळाले.याप्रसंगी शाळेतील आजी व माझी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.चंद्रशेखर खाचणे, श्री महेश खाचणे, श्री .समाधान सपकाळे, श्री .रमेश सोनवणे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रविंद्र पढार सर यांनी केले तर आभार श्री. किशोर माळी सर यांनी मानले.












